तुझी आठवण अली..

ती आत आली डोकं वर काढत घडल्याकडे बघितलं
आज यायला नेहमीपेक्षा थोडा उशिराच झाला
डोळे पाणावले होते थोडे लालसर हि होते
फार दिवसाचं साठलेलं आज बाहेर आलं होतं
हळूच आसवाचा एक थेंब तिच्याडोळ्यांवाटे तिच्या गालावर ओघळला
तो त्याच्या हाताने तो पुसून टाकेल या आशेने ती तशीच स्तब्ध उभी राहिली
पण त्याचा हाथ आलाच नाही ,जो पर्यंत तिच्या ते लक्षात आलं आसवांचे थेंब आता एका निर्बंधित नदी सारखे वाहू लागले होते
खांद्यावरची बॅग कधी खाली पडली हे कळलेच नाही तिने दरवाज्यासमोरच्या सोफ्याकडे धाव घेतली
उशी मध्ये डोकं घालून तिने स्वतःलाच स्वतःपासून लपवण्याचा प्रयत्न केला
पण आता रडण्याखेरीज तिच्या हाती काही उरलं नव्हतं
बाजूला पडलेल्या मोबिलेकडे नजर गेली तर ६ वाजले होते
काही दिवसापूर्वी पर्यंत  याच वेळी त्याचा फोने येत असे
पण आज मोबाइल वाजला नाही
सर्व गोष्टी तिच्या वेदनांना वाढच देत होत्या
ते होणार नाही , जे झालं ते होणारच होता ,मी उगी स्वतःलाच फसवत होते
ती स्वतःच स्वतःची समजूत काढत होती
अश्रूंचा ओघ कमी झाला
चेहऱ्यावरून हाथ फिरवत ती उठली
उठून बेसिन   जवळ  गेली
आरश्यात बघितलं ,पण चेहऱ्यावरचं तेज जणू कुठे तरी हरवला होतं
या निरागस चेहऱ्यावर परत कधी हसू उमटेल का ?
ज्या डोळ्यांमध्ये कधी सुखद स्वप्नांचा साठा होता आज ते अगदी रिकामे होते
ते डोळे परत कधी नव्याने स्वप्ने पाहतील का ?
सुख जे कधी तिच्या आयुष्याचा दुसरं नाव होतं ते कधी परत येईल का ?
चेहऱ्यावरून पाणी फिरवून ती आतल्या खोली मध्ये गेली
थकलेल ते शरीर तिने बेडवर झोकून दिल ,पण दुखावलेल मन कुठे झोकून देणार ?
कुठे चूक झाली ? कुठे गोष्टी फसल्या ? विचार करत तिने डोळे मिटले
डोळे मिटताच त्याचा चेहरा समोर आला …
आणि परत एक असावाच थेम्ब तिच्या  गालावरून  ओघळला …..

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s